बहिणीला नांदवत नसल्याने शालकांची मेहुण्यास मारहाण

0

शिरपूर। तालुक्यातील तर्‍हाडी गावाच्या शिवारात एका 41 वर्षीय व्यक्ती हा बहिणीला वागवत नसल्याचा कारणावरून त्याच्या चौघा शालकांनी त्याला जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजता घडली. या घटनेत मेव्हण्याची मोटार सायकल देखील संशयीत आरोपींनी जाळून टाकली.

दरम्यान जखमींवर धुळे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील आभानपुरा येथील नाना सदा ठेलारी हा तर्‍हाडी गावाच्या शिवारातून मोटार सायकल क्रं. एम.एच.18 ए.बी.7184 ने जात असतांना त्याचे शालक नारायण भगवान ठेलारी, हरी भगवान ठेलारी, वसंत भगवान ठेलारी, गोसावी भगवान ठेलारी सर्व रा.काकळदे ता.शहादा या चौघांनी संगनमतकरून बहिणीला का वागवत नाही? या कारणावरून त्याच्याशी वाद घालत मारहाण केली.