शहादा । बहिणीस नांदविण्यास नेत नसल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून मेहूण्यास जीवे ठार मारल्याची घटना शहादे तालुक्यातील प्रकाशे गावी घडली असून याबाब शहादा पोलिसात दाघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिजराल रमण ठाकरे (वय29) रा.प्रकाशा याने रतिलाल सुभाष बर्डे रा.प्रकाशा यांच्या बहिणीसोबत लग्न झाले होते. मात्र बिजराल हा रतिलाल याचे बहिणीस नांदविण्यास नेत नसल्याच्या कारणावरून सोमवार 13 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास प्रकाशे गावात भरत सामुद्रे यांच्या वेल्डींगच्या दुकानासमोेर बिजवरा ठाकरे यास रतिलाल सुभाष बर्डे याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार केले. तर त्याचा साथीदार छून पुना माळीच याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात बिजराल याचा जागीचा मृत्यू झाला.
शहादा पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत शहादा पोलिसात मयताचे वडिल रमण रघू ठाकरे यांचे फिर्यादीवरून भादंवि 302, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. मुख्य आरोपी रतिलाल बर्डे यास पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार छनू पुना माळीच (प्रकाशा) हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास एपीआय संजय चव्हाण हे करीत आहेत.