बहीणभावाचे चिमटे

0

महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दोघेही बहीणभाऊ जवळपास एकाच वेळी राजकारणात आले. दोघांच्या राजकीय कारकिर्दीस सारखीच सुरुवात झाली. सुरुवातीला दोघांनी एकाच पक्षात काम केले आहे. मात्र, सद्या वेगळे झाल्यामुळे या बहीणभावामध्ये राजकीय वितुष्ट असल्याचे संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. विधानसभेची निवडणूक दोघांनी एकमेकांविरोधात लढली होती. यात पंकजा मुंडे विजयी झाल्या. बीड जिल्ह्यातील दोन्ही नेतृत्वाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचे वारस म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्या. गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पुढे केल्याने नाराज होऊन धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज सद्यघडीला धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक प्रभावी नेते म्हणून ओलखले जात आहे. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे ते संपूर्ण राज्यात अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. त्यासोबत पंकजा मुंडेदेखील कोठे कमी नाही.

मंत्रिमंडळातील प्रभावी व कार्यतत्पर मंत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. विरोधकांकडून होणार्‍या आरोपाला सडेतोड उत्तर देण्यात पंकजा मुंडे अग्रेसर आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत दोघेही घडले आहे. धनंजय मुंडे यांच्या बोलण्याच्या शैलीतून स्व. मुंडे साहेब यांचे लकब दिसून येते.दोन्ही बहिण भावाच्या वाक्ययुद्धाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. परंतु, दोघे बहीणभाऊ आपल्या जागेवर योग्य असून, पदाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. दोन्ही बहीणभाऊ एकत्र आल्यास राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार असल्याचे बोलले जाते तसेच त्यांनी एकत्र यावे अशी संपूर्ण राज्याची इच्छा आहे. परंतु, सद्यःस्थितीतील राजकीय वातावरण पाहता हे शक्य नसल्याचे दिसते. मात्र, असे असले तरी दोघे बहीणभाऊ एकमेकांवर टीका करण्यास व एकमेकांचे चिमटे काढण्यात मागे नाही हे सभागृहात दिसते. पंकजा मुंडे यांच्यावर सरकारचे घटक असल्याने विरोधी पक्षनेते या नात्याने धनंजय मुंडे आरोप करण्याचे एकही संधी सोडत नाही. त्यास उत्तर देण्यास पंकजा मुंडेही मागे नसतात.

विधानपरिषदेत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषणाची आकडेवारी घटली असल्याचे सांगितले. त्यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यास उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेत्याने कुपोषण कमी झाल्याचे सभागृहात उल्लेख केल्याने त्यांचे आभार मानले. विरोधी पक्षनेत्याने केलेले कौतुक पटलावर आले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे काही प्रश्‍न असतील तर त्या सोडवण्यासाठी विरोधी पक्षतेने यांनी माल येऊन भेटावे असा चिमटाही पंकजा मुंडे यांनी काढला. विरोधीपक्षनेते यांनी पहिल्यांदा माझ्या विभागाचे कौतुक केल्याचे सांगत संपूर्ण सभागृहाला हसवले. मात्र, असे असले तरी दोन्ही बहीणभाऊ सभागृहात एकमेकांचे नाव घेणे टाळतात.

– प्रदीप चव्हाण
जनशक्ति, मुंबई
7767012208