बहीणीच्या विश्वासघात करून भावाकडून हक्कसोड लेख दस्त नोंदणी..!

एरंडोल: बहीणीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वाटणीपञ नोंदवित असल्याचे भासवत हक्कसोड करून बहीणीचा विश्वासघात केल्याप्रकरणी भाऊ-भावजयी विरूद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलबाई आनंदा महाजन रा.पातोंडा ता.अमळनेर या अशिक्षित असुन त्यांचे भाऊ व त्यांची एरंडोल येथे सामाईक मिळकत आहे.  त्यांचा भाऊ प्रल्हाद याने आपल्या वडीलोपार्जित जमीनीची सर्वांना वाटणीची नोंदणी केल्यानंतर समान हक्क मिळेल असे सांगीतल्याने भाऊ व वहीनी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन वाटणीची कागदपञे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय,एरंडोल येथे कागदपञांवर अंगठा ठेवण्यास सांगीतले. त्यानंतर त्यांच्याकडे नोंदणीची प्रत मागीतली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपसात समान हिस्से वाटणी न करता विनामूल्य हक्कसोड नोंदणी करण्यात आलेली आहे. 
त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन भाऊ-भावजयीकडून त्यांचा विश्वासघात झाला.
अश्या आशयाची फिर्याद एरंडोल पोलिस स्टेशन ला कमलबाई यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हेड काँन्स्टेबल अनिल पाटील, जुबेर खाटीक,संतोष चौधरी हे करीत आहेत.