बहुआयामी व्यक्तीमत्व – हिरालाल काका चौधरी

0

चंदन जेव्हा दगडावर घासले जाते तेव्हा त्याचा दरवळणारा सुगंध त्याला ‘तु चंदन झाले ’ अशी प्रचिती देते. ऐरवी ते एक प्रकारचे लाकुडच असते. त्याप्रमाणे माणसाचे जिवन असेच संघर्षमय असून असे संघर्षमय जिवनातून समाजकारण, राजकारण, शैक्षणिक व उद्योगक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या व कार्याच्या ठसा उमटवून त्यांच्या कार्याबद्दल नंदुरबार जिल्हा व संबंध तेली समाजाची अभिमानानेछाती फुगून येईन असे मा. श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांनी राजकारण समाजकारण, शैक्षणिक तसेच उद्योग अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून एक आदर्श उभा केला आहे.

हिरालाल काकांचा जन्म 15 सप्टेंबर 1939 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला, काकांचे शिक्षण नंदुरबार येथील लोकमान्य टिळक विद्यालयात झाले. त्यांना लहानपणापसून शिक्षणाची आवड हाती. मात्र घराची परिस्थिती बेताची असल्याने ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत व कामधंद्याला लागले. सुरुवातीस कापड दुकानात, धान्य मार्केटमध्ये त्यांनी मुनीमची व इतर कामे केली काकांचा जीवनपट मांडतांना थोडेसे मागे पाहिले तर आजच्या ऐवढे वैभव, श्रीमंती त्यावेळेस त्यांच्याकडे नव्हती. दुकानात काम करतांना त्यांनी कधी कामाची लाज बाळगली नाही की धान्य मार्केटात काट्यावर तोलाई करतांना त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. ते नेहमी म्हणत कोणतेही काम हे काम आहे. त्यात श्रेष्ठ काय व कनिष्ठ काय त्यात कमीपणा न मानता त्या कामाचा आनंद घ्यावा. श्री समर्थ रामदास व्यायाम शाळेत त्यांनी आला व्यायामाचा छंद पूर्ण केला व पाच पंचविस व्यायाप्रेमी सदैव आपल्या सोबत ठेवत.

नंदुरबार येथील समाजाची मंगलकार्यालयाची वास्तु त्यांनी स्वत:च्या प्रयत्नातुन उभी केली. समाजातील लोकांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव समारंभ, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, एम.एस.सीआयटीचे मोफत प्रशिक्षण, समाज मेळावे या सारखे समाज उपयोगी उपक्रम सुरु केले. त्यांचे हे कार्य फक्त शहरापुरते मर्यादित नसून अवघ्या महाराष्ट्रात समाजबांधणिचे कार्य त्यांनी सुरु केले. आज ते महाराष्ट्र राज्य तेली महासभा मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत.

1978 पासून काकांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली. सतत तीस वर्षापासून नगरसेवक म्हणून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवीला. आजही काका कुठल्याही वार्डात उभे राहिल. शहरातील जनता त्यांना निवडूण देणारच ऐवढे प्रेम लोकं त्यांच्यावर करतात. त्यांनी केलेली विकास कामे याचे फळ म्हणून 1998-99 च्या काळात नंदुरबार शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा बनण्याचा बहुमान त्यांची धर्मपत्नी सौ. इंदुकाकू चौधरी यांना त्यांनी मिळवून दिला. तसेच शंभर सव्वाशे कि.मी. अंतर दूर जावून त्यांनी अमळनेर मतदार संघात आपला मुलगा शिरीषदादा चौधरी यांना मोठ्या मताधिक्क्याने आमदार म्हणून निवडून आणण्याचे सहस आपल्या स्वबळावर करून दाखविले. जे ठरवले ते यशोशिखरावर कसे न्यायचे असा उपजत स्वभाव ‘ आपल्या मुलाला आमदार करण्याच हे निवडणुकीच्या तीन वर्ष अगोदर काकांनी भाकित केले होते.

काकांनी पतसंस्था उघडली या पतसंस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालक, भाजीपाला विक्रेते, चोटे मोठे व्यावसायिक यांना कर्ज उपलब्ध करून देऊन रोजगार मिळवून दिला. समाजकारण व राजकारण क्षेत्राचा पलिकडे काकांना उद्योग व्यापार क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्धी मिळविली. हॉटेल व्यवसायापासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आज साखर उद्योग, एच.पी. ड्रग्स चे संचालक म्हणून त्यांनी स्वत:चा हिरा बिझनेस गृप त्यांचे सुपूत्र डॉ. रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या मदतीने कार्यान्वित केला व देश विदेशात व्यवसायात नाव लौकिक मिळविले आहे. त्यांनी मुलांप्रमाणेच मुलीलाही उद्योग क्षेत्रातील धडे दिलेत आणि म्हणूनच आज त्यांची मुलगी सौ. रेखाताई अरूण चौधरी ह्या स्पा सारख्या मोठ्या उद्योग क्षेत्रात देश विदेशात आपले जाळे विणत आहेत. तसेच काकांचा लहान मुलगा नरेंद्रभाऊ हे देखील व्यवसाय सांभाळत असतात. हिरा प्रतिष्ठाना अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची भव्य सुरुवात झाली. गरीब हातकरू विद्यार्थ्यांसाठी सलवतीच्या दरात शिक्षणाची सोय देखील उपलब्ध करून दिली. अशा या मुरब्बी राजकारणी, समाजकारणी लोकनेत्याच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा. आपल्या नावातच अस्सल ‘हिरा’ असलेले आदरणीय हिरालालकाकांना वाढदिवसाच्या लाख- लाख शुभेच्छा देऊन वंदन करतो. धन्यवाद !!!