बहुचर्चित हातोडा पुलाचे काम पुर्णत्वाकडे

0

 तळोदा । बहुचर्चित हातोडा पुलाचे काम पूर्णत्वास आले असून आता उद्घाटनचा कार्यक्रम लवकर पुर्ण होणार आहे. मात्र या पुलास जोडणारा आवश्यक वळण रस्ताच नसल्यामुळे अवजड वाहने कुठून जातील हा प्रश्न अनुत्तरित आहे. हातोडा पूल झाल्यास धडगांव, अक्कलकुवा, तळोदाकडून येणारी अवजड वाहने तसेच नंदुरबारकडून येणारी अवजड वाहने यांना जाण्यासाठी तळोदा शहरात अजिबात जागा नाही. अगोदरच ठिकठिकाणी मुख्य बाजरात अतिक्रमण असल्यामुळे वाहनाची कोंडी नियमित होत असते, त्यामुळे आता हातोडा पूल सुरू झाला, तरी वाहतूक जाईल कुठून असा प्रश्न उभा राहतो आवश्यक जोड रस्ता डांबिरकरण झाले. या पुलाची वाहतूक वळण्यासाठी वळण रस्ता उपजिल्हा रुग्णलालय समोरून मंजूर देखील आहे. मात्र अजून पावेतो कोणतीही हालचाल दिसून येत नाही.

पुलास जोडणारे मार्ग अरुंद
सार्वजनीक बांधकाम विभाग अंतर्गतपूर्वी हा रस्ता होता आता मात्र केंद्राचा राष्ट्रीय महामार्ग विभाग कडे नुकताच हा रस्ता वर्ग झाला असून आता अक्कलकुवा ते नाशिक असा नवीन राष्टीय महामार्ग मंजूर झाला असल्यामुळे आता या महामार्गाच्या अंतर्गत हा वळण रस्ता येत असल्याने आता या बाबत तात्काळ हालचाली होणे आवश्यक आहे अथवा पूल तयार झाला तरी वाहतूक कुठून निघणार हा प्रश्न अवघड आहे. हातोडा गावाजवळ चौफुली वरून पश्चिमेला जाणारा रस्ता सरळ कुकरमुंडा खाड्सरी जवळ निघणारा रस्ता , एक जुना उंटावद मार्गे मटावल रस्ता एक तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचा जवळून निघणारा अक्कलकुवा कडे जाणारा जोडणारा कच्चा रस्ता आहे

सध्या उपलब्ध मार्ग
पुला कडे जाण्याकरिता तळोदा शहरातील मुख्यरस्ता सोडल्यास गुजरात महाराष्ट हद्दीच्या सीमेलगत जाणार्‍या गुजरात हद्दीतील पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता असून हा रस्ता अतिशय अरुंद असा खेडता पड्याला जोडणार एकेरी रस्ता आहे. त्यामुळे दुचाकी व छोट्या खाजगी चारचाकीला जाण्यासाठी हा रस्ता अक्कलकुवा कडून गुजरात राज्यातील कुकरमुंडा व अश्रावा या गावालगत असणार्‍या ब्रहणापुर अंकलेश्वर मार्गाला जोडतो. गावाला जोडतो तसेच तसेच शहादाकडून सदगव्हांन पुलाचा बाजूने एक अतिशय अरुंद असा पंतप्रधान ग्रामसडक योजनेचाच अतिशय खराब अवस्था असलेला रस्ता आहे जो निभोरा बाळंदा बहुरूपा गावाला पुढे जोडतो व तिथून पुढं पुलाचा अगोदर असणार्‍या हातोडा गांव जवळ निघतो. तसेच अंकलेश्वर व ब्रहणापुर शहादा रस्त्यावर हातोडा गावाजवळ चौफुली वरून पश्चिमेला जाणारा रस्ता सरळ कुकरमुंडा खाड्सरी जवळ निघणारा रस्ता, एक जुना उंटावदमार्गे मटावल रस्ता एक तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचा जवळून निघणारा अक्कलकुवा कडे जाणारा जोडणारा कच्चा रस्ता आहे.