आज रमाईची जयंती 7 फेब्रुवारी 1898 दापोलील वणंद गावी त्यांचा जन्म झाला. अवघ्या 37 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वसतिगृहातील मुलांना अन्न नाही म्हणून स्वतःच्या बांगड्या विकायला देण्याचा उदारपणा रमाईत होता. दोन दिवस मुले जेवली नव्हती, वसतिगृहातील अन्न धान्य संपले होते, त्यावेळीस रमाईने आपल्या खोलीत जाऊन सोन्याच्या बांगड्या काढून वसतिगृह चालवणार्या वराळे काकांच्या हातात दिल्या. कित्येक वर्षे रमाईचा वरळी स्मशानभ्ाूमीतील स्मारक खितपत पडला असून त्याकडे शासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यासाठी बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे स्मारक तडीस नेले पाहिजे.
रमाईचा जन्म एका गरीब परिवारात झाला. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वणंद गावात राहत होती. त्यांना तीन बहिणी एक भाऊ होता. भिकू धुत्रे दाभोळ बंदरात मासे भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमाई लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले, आईच्या जाण्याने त्यांच्या कोवळ्या मनावर मोठा आघात झाला. काही दिवसांनी वडिलांचे निधन झाले. पुढे वलंगकर काका व मामा गोविंद पुरकर मुलांना घेऊन भायखळा मार्केटच्या चाळीमध्ये राहावयास गेले. त्याचदरम्यान सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी मुलगी पाहत होते. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाईच्या हातात साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळाच्या भाजी मार्केटमध्ये सन 1906 या वर्षी झाले, अगदी बालवयात रमाईचे लग्न झाले अतिशय साध्या पद्धतीने लग्न झाले. सन 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले त्यावेळीस रमाईची खूप वाताहत झाली होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहवत नव्हते. त्यांनी काही पैसे जमा केले. ते पैसे रमाईला देऊ केले तिने त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाही. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी होती. जिद्दीने दु:खाशी सामना, मृत्यूसत्र, दु:खत्याग, समजूतदार, कारुण्य उदंड मानवता व पे्ररणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने ती थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय ते कळत नव्हते, या वयात आईवडिलांचा मृत्यू, सन 1913 साली रामजी सुभेदार यांचा मृत्यू, सन 1914 ते 1917 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू व बाबासाहेब यांचा मोठा भाऊ आनंदराव यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, सन 1926मध्ये बाबासाहेबांचा लाडका मुलगा राजरत्न यांचा मृत्यू अगदी जवळून पाहिला. तरी रमाई प्रत्येक दु:खाला तोंड देत खंबीर उभ्या होत्या. बाबासाहेबांनी शिक्षणात व्यत्यय नको म्हणून त्यांनी काही गोष्टी कळवल्यासुद्धा नाही. रमाईने आपल्या दु:खाची झळ कधी बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही. कुटुंब चालवण्यासाठी तिने शेण, गोवर्या सरपणासाठी वनवन पोयबा वाडी दादर ते माहीमपर्यंत जात असे.
बॅरिस्टरची पत्नी शेण वेचायला जाते. लोक नावे ठेवतील म्हणून सकाळी पहाटे व रात्री आठ नंतर गोवर्या थापण्यासाठी जात असे, आपल्या मुलांसाठी अनेक दिवस तिने उपाशी राहून दिवस काढले. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णांत डॉ. होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले त्याच वेळी त्यागाने आणि कष्टाने स्वत:च्या संसाराचा गाडा चालवून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. एकदा बाबासाहेेबांना परदेशी जायचे असता रमाईला एकटे घरी कसे ठेवायचे, हा प्रश्न बाबासाहेबांना पडला असता त्यांनी धारवाडच्या त्यांच्या वराळे नावाच्या मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस येथे राहावयास आले. वराळे काका मुलांचे वसतिगृह चालवत असे. मुले ते अंगणात खेळत असे अचानक दोन दिवस मुले खेळण्यासाठी बाहेर आली नाहीत. म्हणून रमाईने वराळे काकांना विचारले असता त्यांचे उत्तर ऐकून रमाई सुन्न झाली. कारण दोन दिवस मुले जेवली नव्हती, अन्न धान्य संपले होते, त्यावेळेस रमाईने आपल्या खोलीत जाऊन सोन्याच्या बांगड्या काढून वराळेंच्या हातात दिल्या आणि त्यांना सांगितले की, या बांगड्या गहाण ठेवून मुलांसाठी अन्न धान्य घेऊन या. मी मुलांना उपाशी नाही बघ्ाू शकत. नंतर मुले जेवल्यावर रमाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि त्याच क्षणापासून ती मुले रमाईला ‘रमाआई’ असे म्हणू लागले. त्याच क्षणापासून रमाबाई रमाआई झाल्या. रमाईचे शरीर काबाडकष्ट करून पोखरून गेले होते, आजार बळावला होता, बाबासाहेबांनी नामवंत डॉक्टरांना पाचारण केले, तर काही उपयोग होत नव्हता, औषधोपचार लागू होत नव्हता. बाबासाहेब त्यांच्या शेजारीच बसून असायचे, अखेर 27 मे 1935 रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर, बहुजन समाज, आकांतात बुडाला. कोट्यवती रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली. महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले, रमाई निघ्ाून गेल्याने बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी पडले. ‘अशा मातेस नतमस्तक होऊन त्रिवार वंदन करतो’ मला एक सूचना करावीशी वाटते कित्येक वर्षे रमाईचा वरळी स्मशान भ्ाूमीतील स्मारक खितपत पडले असून त्याकडे शासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यासाठी आता सरकारची वाट न पाहता बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे स्मारक तडीस नेला पाहिजे. त्यासाठी राजकीय बंधने तोडून एकत्रीत यावे असे मला वाटते!
-जगदीप कांबळे
कार्यकर्ता चेंबूर, मुंबई
9967116328