जळगाव । ब्राम्हणांकडून बहुजनांच, ओबींसींच आदिवासींच हित बघितल जात नाही. नीट, ईव्हीएम मशीन यांसारखे विविध धोरण राबवून ब्राम्हणीय व्यवस्थेकडून बहुजनांसह एकप्रकारे लोकशाहीला, संविधानाला संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या व्यवस्थेविरोधात तसेच बहुजन समाजाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच लढा म्हणून जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय युवा मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ़ विराज दाणी यांनी केले़ भीमा कोरेगावच्या रणसंग्रामातील ऐतिहासिक विजय शौर्य दिन द्विशताब्दी स्मृती वर्ष अभियानातंर्गत भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा या संघटनांचे तिसरे जिल्हा अधिवेशन रविवारी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते़
यांची होती उपस्थिती
उमवि संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राकेश रामटेके, उमवि व्यवस्थापन शास्त्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ.अनिल डोंगरे, राज्य उपाध्यक्ष रत्नेश इंगळे, रज्य महासचिव किरण शिंदे, प्रा.मिलींद संदानशिव, प्रा़ निलेश गुरचळ, प्रा.विठ्ठल सावकारे, प्रा.डॉ.विजय कांबळे, प्रा.नितीन इंगळे, प्रा़ किर्ती सोनवणे, मुलांचे शासकीय वसतीगृहाचे अधीक्षक विजय गाढे, डॉ़ प्रकाश खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते. इंडियन मेडिकल प्रोबेशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ प्रशांत तायडे यांच्या हस्ते औपचारिकरित्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रास्ताविकात किरण शिंदे यांनी अधिवेशाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी जनआंदोलनासाठी निधीची घोषणा करण्यात येवून निधी डॉ़ विराज दाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉ़ राकेश रामटेके, प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले़
समाजहिताच्या विविध विषयांवर मान्यवरांनी केली चर्चा
नीट राबविणाजया कंपनीत खाजगी लोकांची घुसखोरी वाढल्याने युएसने नीट नाकारली, जपान, फ्रान्स, जर्मनी, युएसए यांनी ईव्हीन मशीन नाकारले. मात्र भारतात बहुजनांचे नेतृत्व निर्माण होवू नये म्हणून व्यवस्थेने नीट आणि ईव्हीएम मशीन या दोन्ही गोष्टी स्विकारल्या़ ज्या पंडीत दिनदयालाय यांनी आदिवासींचा विरोध केला, त्यांच्याच नावाने योजना सुरु करण्यात आली, यामागचा उद्देश काय? असा प्रश्नही दाणी यांनी उपस्थित केला. ओबीसी व आदिवासींचीही हीच स्थिती असून एवढ्या गंभीर बाबीवर कुणीही बोलायला किंवा नेतृत्व करायला समोर येत नाही हे दुर्देव्य आहे़ 2024 मध्ये ब्राम्हणराष्ट्र बनवायचे स्वप्न पाहणाजया या व्यवस्थेविरोधात तरुणांनी संघटीत झाले पाहिजे. नाहीतर येणारी बहुजनांची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही पुढे बोलतांंना डॉ़ विराज दाणी म्हणाले.