बहुजन क्रांती मोर्चाची तालुका कार्यकारिणी गठीत

0

भुसावळ। बहुजन क्रांती मोर्चातर्फे तालुका कार्यकारिणी व विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहे. तसेच बहुजन समाजाचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी 12 एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या समितीमध्ये आर.पी. तायडे, यशवंत धायगुडे, संतोष काकडे, मोतीलाल जोगी, ओंकार पाटील, दिपक आमोदकर, धृपतीराव करंकाळ, बी.एन. जाट, महेमूद पटेेल, जितेंद्र नामदास, आनंद सपकाळे, विजय सावळे, प्रशांत तायडे, हाफिज फिरोज, प्रकाश तायडे, समन्वय समितीमध्ये शेख हमीद, प्रशांत वंंजारी, सतिश कवटे, संदिप शिंगारे, स्टेज समितीमध्ये अरुण म्हस्के, जनार्दन जाधव, बी.एन. शेख, मुकेश पवार, विजय देवरे, अर्थसमितीमध्ये रविंद्र बहाळे, बाळू पाटील, नासिर भोई, राजेंद्र सुरवाडे, गणेश सरोदे, शशिकांत इंंगळे, सुरक्षा समितीमध्ये मिलींद साळुंके, हरिष पाने, बापू गायकवाड, शरद पाटील, दिपक महाजन, आर.बी. इंगळे, यु.बी. सुर्यवंशी यांचा समावेश आहे. सदर मोर्चा 12 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालय चौफुलीपासून प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रचार समिती सदस्य विजय सावळे यांनी केले आहे.