भुसावळ । बहुजनांच्या हक्क व न्याय मागण्यांसाठी येत्या 12 रोजी काढण्यात येणार्या बहुजन क्रांती मोर्चाची बैठक शहरातील खडका रोडजवळील कुरेशी हॉल मध्ये नुकतीच झाली. बैठकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. शेख हमीद, सुमित्र अहिरे व मिलींद साळूंखे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 12 एप्रिल रोजी शहरातील म्युनिसीपल हायस्कूल ते प्रांत कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 52 गाव व 2 नगरपालिका हद्दीतील विविध जाती धर्मातील नागरिक बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे..
अॅट्रासिटी अॅक्ट अधिक कठोर करण्यात यावा, इव्हीएम काढून मतपत्रिकेचा सक्तीने वापर करावा, कॉमन सिव्हील कोड हा अल्पसंख्याक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा विकास करण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येईल. यावेळी आनंद सपकाळे, राजेंद्र सुरवाडे, अरुण मस्के, समाधान जाधव, शेख हमीद, संजय बांगर, रविंद्र बहाळे, ओंकार पाटील, सतिश कवटे, गणेश तेली, दिपक अमोदकर, संजय भटकर, आर.बी.परदेशी, आनंद जाधव, जे.पी.सपकाळे व मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.