बहुजन क्रांती मोर्चातर्फे ईव्हीएम नियमावली जाळून निषेध

0

बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक ; स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे नागरीकांसह व्यापार्‍यांना आवाहन

भुसावळ- देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीत निकाय काय लागतील हे आधीच ठरले असल्याने हे निकाल मान्य बहुजन क्रांती मोर्चासह अन्य सर्व समविचारी संघटनांनी मान्य नसल्याने देशभरात 22 रोजी सायंकाळपासून भारत बंदची हाक देण्यात आली आहे तर या पार्श्‍वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चासह अन्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 22 रोजी पत्रकार परीषद घेत निवडणूक आयोगाच्या कंडक्टरमधील 56 सी, 56 डी व 49 एमए या कलमांचा (ईव्हीएम) नियमावलीचा जाळून निषेध केला. याप्रसंगी नागरीकांसह व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचेही आवाहन केले.

पत्रकार परीषदेला यांची होती उपस्थिती
भारत मुक्ती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रतिभा उबाळे, पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सहसचिव हारून मन्सुरी, राकेश बग्गन, पीआरपी युवा उत्तर महाराष्ट्र राष्ट्रीय मोलकरीण सेना जिल्हाध्यक्षा संगीता ब्राह्मणे, पीआरपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आरीफ शेख, श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाध्यक्ष सुनील ठाकूर, बसव ब्रिगेड जिल्हाप्रमुख तुषार शिवपूजे, कैकाडी संघटना जिल्हाध्यक्ष बापू गायकवाड, सुनील ढिवरे, बाळकृष्ण सोनवणे, कल्पना म्हस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.