बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे 26 एप्रिल रोजी आंदोलन

0

चाळीसगाव । बहुजन क्रांती मोर्चा चाळीसगाव संयोजन समितीच्या वतीने मंगळवार 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रलंबित असलेल्या विवीध मागण्यांसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन बहुजन समाजाने बहुजन क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील मोर्चा हा चाळीसगाव रेल्वे स्थानकापासून निघणार आहे.

मोर्चाच्या माध्यमातून या आहेत मागण्या
लोकशाहीला घातक मतदान मशिन बंद करुन बँलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे, शेतकर्‍यांचे कर्ज, विजबिल माफ करा, पिकांना हमी भाव द्या, शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र अर्थ संकल्प असावा, मराठा, धनगर यांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, अँट्रासिटी कायद्याची प्रभावी पणे अंमलबजावणी व्हावी, उसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मीती करावी, बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळावा, जातपडताळणी प्रमाणपत्रातिल जाचक अटी रद्द करा, नु.जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक आदी विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती द्यावी, औंद्योगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये, कंपन्यांमध्ये भुमिपुत्रांना प्राधान्य द्यावे यांसह आदी महत्वाच्या मागण्यांसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चा यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.