प्रा.रमेश मकासरे : भुसावळात पार पडले बामसेफचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर
भुसावळ- कलम कसायांनी दडवून ठेवलेला बहुजन महापुरूष व संताचा खरा इतिहास बामसेफच्या माध्यमातून पूर्नप्रसारीत केला जाणार असून बहुजनांमध्ये जागरूकता निर्माण करून आमचे शत्रू कोण व मित्र कोण यांची ओळख निर्माण केली जाणार आहे, असे बामसेफचे राज्य प्रचारक प्रा.रमेश मकासरे यांनी येथे सांगितले. शहरातील कुरेशी सभागृहात बामसेफच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केले तर प्रमुख पाहुणे व शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक बामसेफचे राज्य प्रचारक प्रा.रमेश मकासरे (अहमदनगर)यांची उपस्थिती होती.
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हाच बामसेफचा उद्देश
यावेळी प्रा.मकासरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना क्रांती मोर्चा व परीवर्तन यात्रेच्या निमित्ताने बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते जोडले गेले. अशा कार्यकर्त्यांना बामसेफच्या सामाजिक कार्य व उद्दीष्टांची माहीती व्हावी यासाठी राज्यभर एकाच दिवशी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. बहुजन महापुरूष आणि बहुजन संतांचा प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध जो संघर्ष व तोच उद्देश बामसेफचा असल्याचेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
शिबिराचे प्रास्ताविक शारदा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सतीश जगंले यांनी केले. शिबिराला चोपड्याच्या नगरसेविका संध्या नरेश महाजन, जिल्हा संयोजक राजू खरे, भुसावळचे माजी नगरसेवक जलील कुरेशी, साबीर शेख, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे हाफीज फिरोज, एमआयएमचे फिरोज शेख, मुस्लीम लिगचे हकीम खान, मुस्तफा खान, आसीफखान इकबाल खान, राकेश बग्गन, अनिस भाई यांच्यासह जिल्हाभरातील किमान 300 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सर्वांची भोजन व चहापाण्याची व्यवस्था अनिसभाई यांनी केली होती.