जळगाव । बहुजन मुक्ती पार्टीतर्फे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ स्वातंत्र्यचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार दुपारी धक्का मारो आंदोलन केले. यात बैलगाडी, मोटारसायकल, रिक्षा व चारचाकी वाहनांना ढकलून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन जाण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांंना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहे. राज्य सरकारने वाढविलेल्या वीजबिल व खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामन्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय. ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
बहुजन मुक्ती पार्टीचे हारुन मन्सुरी, जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, जिल्हा कार्याध्यक्षक अलीम शेख, जिल्हा
महासचिव विजय सुरवाडे, सुनीता पवार, महिला आघाडीच्या संध्या कोचुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. आंदोलन यशस्वितेसाठी विनोद अडकमोल, रवींद्र वाडे, प्रमोद सैदाणे, सुनील शिंदे, अजय इंगळे, इरफान शेख, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रहीम तांबोळी, सुभाष सुरवाडे, विजय साळवे, संगीता देहाडे, अनिता पांढरकर, राजश्री अहिरे यांनी परिश्रम घेतले.
Prev Post
Next Post