बहुजन विकास अघाडीतर्फे गुणवंतांचा सत्कार

0

पालघर : बहुजन विकास आघाडीतर्फे यावर्षी सुद्धा 10 वी 12 वी परीक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव समारंभ पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे, माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर, पालघर तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, पक्षाचे वरिष्ठ नेते पोशा अण्णा, पालघर शहर अध्यक्ष अरुण माने, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा शालिनी मेनन, जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, पंचायत सनिती सदस्य प्राची पाटील, सुदेश दीक्षित, पी. एम. पाटील, अजय राऊत, संतोष चुरी, विजय राऊत, संदेश पाटील, बहुजन विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.टी. पाटील यांनी केले.