मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढणार आहे. कारण बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे तीनही आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत, पाठींबा जाहीर केला आहे. शरद पावर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. सत्ताधारी पक्षासोबत गेल्याने कामाला गती मिळेल या दृष्टीनेच बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे.
हितेंद्र ठाकूर यांनी कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली, त्यांना देखील महाविकास आघाडीला पाठींबा देणार असल्याचे सांगितले आहे.