भुसावळ- चौधरी हिरो, भुसावळ येथे हिरो मोटोकॉर्पची नवीन स्कूटर डेस्टिनी 125 दाखल झाली आहे. जगातील नंबर एकची दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्प लि. ने डेस्टिनी 125 ही नवीन स्कूटर बाजारात आणली आहे. ह्या गाडीत क्रांतिकारी आयथ्रीएस (हिरो पेंटेट टेक्नालॉजी) प्रथमच भारतातील स्कूटरमध्ये आणण्यात आली असून 125 सीसीचे दमदार इंजिन आहे. एक्सटरनल फिऊल फिलिंग, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम, डिजिटल मीटर, बूट लाईट, डुएल टोन सिटकव्हर, बॉडी कलर मिरर्स (काही फिचरस ऐच्छिक) देण्यात आले आहे. ग्राहक अशोक धरमदास चुटीले यांना चौधरी ग्रुप ऑफ ऑटोमोबाईल्सचे संचालक महेश भागवत चौधरी यांच्या हस्ते नवीन व पहिली डेस्टिनी 125 गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी इंडसीण्ड बँकेचे मॅनेजर अनिल माळी, बेरार फायनान्सचे मॅनेजर मुकेश सोनवणे, मनीष सोनवणे, श्रीराम सिटी फायनान्सचे मॅनेजर नीळकंठ सोनवणे, हिरो फिनकॉर्पचे मॅनेजर अजय पांढरे तसेच चौधरी मोटर्सचे जनरल मॅनेजर केवल प्रकाश जंगले आदी उपस्थित होते. या गाडीला उत्साही युवा वर्गांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.ही गाडी पाहण्यासाठी, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व टेस्ट राईडचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी चौधरी हिरोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन चौधरी हिरो व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.