बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे पेशवे बाजीराव जयंती साजरी

0

जळगाव प्रतिनिधी । बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरातील पत्रकार भवनात पेशवे बाजीराव जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांच्यासह संघाचे अध्यक्ष संजय व्यास, इंदरचंद शर्मा, अशोक वाघ, श्रीकांत खटोड, विश्‍वनाथ जोशी, शिव शर्मा, राजेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संजय व्यास म्हणाले की, ज्यांनी कधी पराभव पाहिला नाही. मनगटाच्या जोरावर युद्धे जिंकली. दिल्ली काबीज केली. ज्याच्या पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या. तो जगातला एकमेव, उत्तम संघटनकौशल्य असलेला अजेय योद्धा म्हणजेच बाजीराव पेशवा होय. बाजीरावांना हरवणे त्यांच्या काळातील शत्रूंना जमले नाही. मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे नेणारा पहिलाच सेनापती होता. दिल्लीपर्यंत धडका मारून त्यांनी मराठ्यांचा दरारा निर्माण केला. हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.