बहुमतासाठी ३० तारखेची मुदत

0

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमतासाठी भाजपा, राष्ट्रवादी पक्षाला ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. भाजपाने १७० आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे. संध्याकाळी साडेचार वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत नेमकी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवारांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगितले आहे. भाजपाच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे.