मुंबई: काल शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली. सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे उघड झाले आहे. सर्व आमदार राष्ट्रवादीतच आहेत. दरम्यान आता थोड्याच वेळात भाजप आमदारांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यावर खलबत होणार आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री तर झाले आहे, पण बहुमत सिद्ध करताना मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे. आजच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री आमदारांना मार्गदर्शन करणार असून बहुमत सिद्ध होईल याचा विश्वास देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे बैठकीसाठी दाखल झाले आहे.
शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने भाजप बहुमत सिद्ध करणार नाही हा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टात देखील हे प्रकरण गेले आहे. आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. उद्या १०.३० वाजेपर्यंत अजित पवारांनी दिलेले कागदपत्रे दाखल करण्याबाबत सूचना आदेश आले आहे. त्यानंतर उद्या निकाल दिला जाईल. तूर्त तरी एका दिवसासाठी भाजपला दिलासा मिळालेला आहे.