जळगाव : दुचाकी स्लीप झाल्याने सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणावर गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फरीद जमाल तडवी (37, रा.बहुलखेडा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर ईजा
फरीद तडवी हा आई, पत्नी व मुलांसह वास्तव्यास होता. रविवार, 12 जून रोजी सायंकाळी एका ठिकाणचे काम उरकावून सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बहुलखेडा गावानजीक रोडवरून येत होता. पाऊस आल्याने रस्ता ओला झाला होता. त्यावेळी फरीद दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी घसरल्याने फरीदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला खाजगी वाहनाने रात्री 8 वाजता गोदावरी मेडीकल कॉलेजात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आील. जिल्हा शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणाच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा मुलगी असा परीवार आहे.