ढाका । कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाने बुधवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ढाक्यातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यामधला बांगलादेशचा हा पहिला विजय आहे. आतापर्यंत दोन्ही संघात 5 क सोटी सामने झाले असून पहिल्या 4 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर बांगलादेशने नांगी टाकल्याचे दिसले. त्यानंतर आज ऐतिहासिक विजयाची नोंद करत दोन दिवसांच्या कसोटी सामन्यात बांगलादेशने आघाडी घेतली. बांगला देशने पहिल्या डावात 43 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 221 धावांवर आटोपला.
चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज परतवून लावेल, असे वाटत असताना बांगलादेशने पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवली. शाकिब उल हसनच्या अफलातून गोलंदाजीसमोर डेव्हिड वार्नरची शतकी खेळी व्यर्थ ठरली. हसनने या सामन्यातील पहिल्या आणि दुसर्या डावात त्याने प्रत्येकी 5 बळी मिळवले. याशिवाय मेहदी हसन 3 तर तिजुल इस्लामने दोन बळी घेत हसनला उत्तम साथ दिली.डेव्हिड वार्नरशिवाय एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. पीटर (15), मॅक्सवेल(14), मॅथवे वेड(4), ऍशटन एजर(2), नॅथन लायन(12) नावाला साजेशा खेळ करु शकले नाहीत. हेझलवूड तर खातेही उघडू शकला नाही.