कोलंबो । बांगलादेश व श्रीलंका याच्या कसोटी मालिका सुरू होती. कसोटीतील शेवटचा सामना हा बांगलादेशाचा 100 वा कसोटी होता.ते जिकून बांगलादेशाने मालिका 1-1 बरोबरी साधून श्रीलंकेला घरच्या मैदानावर मालिका जिकण्याचे स्वप्न भंगले. बांगलादेशाने 100 कसोटी सामने खेळले आहे.त्यापैकी फक्त 10 कसोटी जिकले आहे.त्यामध्ये सर्वात महत्वाचे 100 व्या कसोटीत विजय मिळविला आहे. तर 76 कसोटीमध्ये बांगलादेशाला पराभवाचा सामना करावा लागला. 15 कसोटी अनिर्णीत राहिले आहे.
बांगलादेश, श्रीलंका मालिका बरोबरीत
बांगलादेशने आपल्या 100 व्या कसोटीत शानदार विजय संपादन करून मालिका बरोबरीत राखली. सलामीवीर तमीम इक्बालच्या (82) शानदार अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने कसोटी जिंकली. या विजयाच्या बळावर बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे यजमान श्रीलंका संघाचे घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार तमीम इक्बाल सामनावीर आणि शाकिब-अल-हसन हा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. शाकिबने मालिकेत 169 धावा आणि एकूण 9 विकेट घेण्याची शानदार कामगिरी केली. बांगलादेशचा कोणत्याही कसोटीतला श्रीलंकेविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. हे यश बांगलादेशला 100 व्या कसोटीत मिळाले. बांगलादेश चौथा संघ । आपल्या 100 व्या कसोटीत विजय संपादन करणारा बांगलादेश हा संघ ठरला. बांगलादेशने 100 व्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत केले. यापूर्वी आपल्या 100 व्या कसोटीत ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान टीमने विजय संपादन केले आहेत. बांगलादेशच्या तमीमने एकाकी झुंज देताना 125 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व एका षटकारासह 82 धावांची खेळी केली. त्याने शब्बीरसोबत तिसर्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी रचली.