बांगलादेशी जोडप्यासह त्रिकुट ठरले दोषी

0

ठाणे । बांगलादेशातून मुलींना आणून त्यांच्याकडून काही जण वेश्याव्यवसाय करून घेत होते. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. खलिपे यांनी साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरत पिटा अंतर्गत एका बांगलादेशी जोडप्यासह त्रिकुटाला दोषी ठरवले आहे. दोषी त्रिकुटाला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 26 हजाराचा प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाला या या देहविक्रीच्या रॅकेटची माहिती मिळाली होती. त्या आधारे पथकाने 21 ऑगस्ट 2012ला टाकलेल्या उपवन येथील छाप्यात वेश्याव्यवसायात गुरफटलेल्या 5 महिलांची सुटका केली. यात 2 अल्पवयीन मुलींचा समावेश होता. तर हा देहविक्रीचा व्यवसाय चालविणार्‍या आरोपी अब्दुल उर्फ अफझल शेख उर्फ गफ्फार शफीउद्दीन शेख (48), शिवाली उर्फ संगीता अब्दुल अफझल शेख (36) आणि शिवालीची बहीण नर्गिस अब्दुल हसन मंडळ (30) यांना अटक करून त्यांच्याविरोधात सेक्शन 3, 4, 5, 6, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 कलम 366 अ, 366 ब, 372 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून 5 महिलांची सुटका करण्यात आली होती. यात 2 अल्पवयीन मुलींचा समावेश होता.

हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. सी. खलिपे यांच्या न्यायालयात आले होते. खटल्यात सरकारच्या वतीने सरकारी वकील वंदना जाधव आणि रेखा हिवराळे यांनी न्यायालयाला सांगितले. 21 ऑगस्ट 2012ला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध खात्याच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर हॉटेल उपवन येथे छापा टाकला आणि 5 पीडितांची सुटका केली. आरोपी त्रिकुटांकडे पथकाने बोगस ग्राहक पाठवून 5 महिलांसह रंगेहात आरोपींना अटक केल्याचा युक्तीवाद केला. आरोपी अब्दुल उर्फ अफझल शेख आणि शिवाली उर्फ संगीता अब्दुल अफझल शेख या जोडप्याच्या 11 वर्षीय मुलाला निर्देशानुसार बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.

बळीत महिलांना समप्रमाणात दंडाची रक्कम
आरोपी यांनी वेश्याव्यवसायासाठी बांगलादेश येथून भारतात आणण्यात आले होते. यामधून मिळालेल्या पैशातून आरोपी त्रिकुटाचा उदरनिर्वाह होत होता. न्यायालयात सरकारी वकिलांनी सदर केलेले साक्षी पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि 26 हजाराचा दंड ठोठावला. ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. खलिपे यांनी आपल्या निकालात सरकारी वकील आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने आरोपींवर लावलेल्या कलमांमध्ये आरोपी दोषी ठरले. तर 5 बळीत महिलांना दंडाची 70 हजारांची रक्कम ही समप्रमाणात देण्यात यावी. तसेच ही भरपाई अल्प असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याने या पीडितांना भरपाई म्हणून आर्थिक यथायोग्य रक्कम निकालानंतर 2 महिन्यांच्या कालावधीत द्यावी, असा निकाल दिला.