ढाका : बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांकडून श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती रस्त्यावर यावेळी मिरवणूक काढण्यात आली होती.
देवीच्या मंदिरापासून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत सहभागींनी पारंपरिक वेषभूषेसह भगवान कृष्णाची वेशभूषा साकारली होती. जन्मष्टामीचा हा सण केवळ भारत किंवा बांग्लादेशातच नव्हे तर दक्षिण आशियातील नेपाळ, भूटान, ब्रम्हदेश आदी देशांमध्ये साजरा केला जातो. नेपाळ मधील ललितपूर येथील श्रीकृष्ण मंदिरातही जन्माष्टमीचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.