बांडगुळांमुळे नव्हे नाथाभाऊंमुळे पक्ष वाढला!

0

मुक्ताईनगर । भारतीय जनता पार्टी नाथाभाऊंमुळे पार्टी मोठी झाली आहे, आयत्या बांडगुळांमुळे नाही. आताचे आलेले आम्हाला शिकवायला लागले आहेत.. अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या मानातील संतापाला मोकळी जागा करून दिली. शहरात शनिवारी मतदारसंघातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. येथील जेडीसीसी बँकेजवळील पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात सामाजिक राज्यमंत्री दिलिप कांबळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, रोहिणी खडसे, प्रा.सुनील नेवे, डॉ. राजेंद्र फडके, जयपाल बोदडे, ललित महाजन, विनोद सोनवणे यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व मुक्ताईनगर मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाईंची चौकशी कधी?
माजी मंत्री खडसे पुढे म्हणाले, की यापुर्वी भाजपाची स्थिती म्हणजे वाणी-ब्राह्मण व धनदांडग्यांचा पक्ष अशी होती. मुंडे, महाजनांच्या काळात बहुजनांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात एकही आरोप झाला नव्हता. अलीकडे झालेले खोटे आरोप व मिडीया ट्रायलमुळे त्रस्त झालो होतो. आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळले नाही, एवढे मला डुबविण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न होता. मंत्री देसाईंनी तीस हजार एकर जमीनीचा घोटाळा केला, तर त्यांची चौकशी आंतरराष्ट्रीय न्यायधीशांमार्फत करणार आहे का? असा खोचक प्रश्न त्यांनी केला.

मुक्ताईनगरात वाय-फाय
खासदार रक्षा खडसे यांनी भाऊंच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाची कामे रखडलेली आहे. तसेच मतदार संघातील मोठी शहरे वाय फाय फ्री करायची आहे. त्यानुसार नाथाभाऊंच्या वाढदिवसाचे निमित्त साधत मुक्ताईनगर शहरात शनिवार पासुन वाय फाय फ्री ची सेवा सुरु करण्यात आलेली आहे. यापुढे रावेर तालुक्यातील मोठ्या शहरांमध्ये ही देणार असल्याची घोषणा केली.

यांची होती उपस्थिती
डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, आमीर साहेब, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, सह प्रमुख शिवाजीराव पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, चिटणीस कैलास चौधरी, राजू माळी, योगेश कोलते, शकील सर, विलास धायडे तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.