अमळनेर। रेल्वे स्थानकावर बांद्रा-पटना या गाडीला थांबा देऊनही अचानक थांबा रद्द करण्यात आला. हे लक्षात आल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी कार्यकर्त्यांसह अमळनेर रेल्वे स्थानकावर ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर असे की,नव्यानेच सुरू झालेल्या बांद्रा-पटना गाडीला अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला होता. पण जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा ए टी पाटील हे आज दि 13 रोजी अमळनेर होळ दरम्यान विद्युतीकरण सह दुहेरी करणाच्या ई लोकार्पण चर्चगेट मुंबई येथून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते होणार होते व रेल्वे स्थानकाची पहाणी करण्यासाठी आले असता ही गाडी अमळनेर येथे थांबणार नसल्याचे कळल्याने त्यांनी याच ठिकाणी कायमस्वरूपी या गाडीला थांबा मिळण्याकरिता कार्यकर्त्यांसोबत ठाण मांडल्याने अधिकार्यांनीही भंबेरी उडाली.
गाडीला कायम थांबा मिळण्याची मागणी: यावर खासदार पाटील यांच्याशी वरिष्ठ अधिकारी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए.के.गुप्ता, मंडल रेल प्रबंधक मुकुल जैन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक तेजस पिंगळे यांच्याशी या गाडी संदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधता व मुंबईहून भेटीसाठी आलेले विभागीय मंडळ अभियंता पियुष पांडे, नंदुरबार विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक राजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून या गाडीला आज पुरता एक मिनिटांचा थांबा देण्यात आला. मात्र या गाडीस नेहमीसाठी थांबा देण्यात यावा, यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे विभागीय सल्लागार बजरंग अग्रवाल, शहराध्यक्ष हरचंद लांडगे, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन दिलीप जैन, झुलाल पाटील, निर्मल कोचर, जय कोठारी, सुभाष चौधरी, महेश पाटील, कैलास भावसार, बापू हिंदुजा, शरद सोनवणे, भरतसिंग परदेशी, मच्छिंद्र लांडगे, दीपक पवार आदी उपस्थित होते.