बांद्रा पॅकर्सचा मोठा विजय

0

मुंबई । बांद्रा पॅकर्स संघाने सोमलॅड फुटबॉल क्लबचे आव्हान सहज परतवत 16 व्या बांद्रा वेस्ट फुटबॉल लीग स्पर्धेतील प्रिमीअर डिव्हीजनमध्ये 6-2 असा मोठा विजय मिळवला.

या सामन्यात विजेत्या संघाच्या रॅनझी कालीचरण, वॅविलन डिसोझा, रायलिन डिमेलो, नाथन डिरोझारिओ, डॅरीस फर्नांडेस आणि अभिषेक वाघेलाने प्रत्येकी एक गोल करत संघाच्या खात्यात विजयाचे पूर्ण गुण जमा केले. पराभूत संघाच्या असद मुन्शी आणि अरिफ कुरेशीने प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत चिंबई स्पोर्ट्स क्लबने कॉम्पनर्स स्पोर्ट्स क्लबचा 7-0 असा धुव्वा उडवला. फ्लॉईड धर्मईने प्रतिस्पर्धी संघाचा बचाव खिळखिळा करताना पाच गोल केले.