शिंदखेडा। येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अभियंता संजय आंनदराव बागुल यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आल्याने सर्वत्र तर्कविर्तक लावण्यात येत आहेत. फिर्यादीची आजेसासू हीस 2013-14 साली घरकुल मंजूर झाले होते.
शाखा अभियंता संजय बागुल याने तुझे घर बांधण्याचा ठेका मी घेतला असल्याचे सागूंन व्हाऊचरवर अंगठे घेवून परस्पर पैसे काढून घेतले. मात्र, घराचे बांधकाम केले नाही. फिर्यादीच्या आजेसासूने संजय बागूल विरोधात शिंदखेडा न्यायालयात केस दाखल केली होती. याची विचारणा करण्यासाठी बागूल व दोघ अदाजे येथे गेले. यावेळी शब्दीक चकमक उडून त्योच पर्यावसन शिवीगाळमध्ये झाले. संजय बागुल याने फिर्यादिच्या डोक्याला काठीने दुखापत करून विनयभंग केल्याची तक्रार फिर्यादीने शिंदखेडा पोलीसात दाखल केली आहे.