A Construction Worker in Bhusawal Died After Falling From The Roof भुसावळ : छतावर बांधकाम करीत असताना तोल गेल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 7 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ईकबाल ईस्माईल गवळी (अन्सार उल्ला मशीदजवळ, लाल बिल्डींग, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रविवार, 7 रोजी ईकबाल गवळी हे ईमारतीच्या गच्चीवर बांधकाम करीत असताना त्यांचा तोल जावून ते जमिनीवर कोसळले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना डॉ.मानवतकर हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू ओढवला. तपास पोलिस नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.