बांधकाम कामगारांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

0

जळगाव : बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार 13 रोजी मोर्चां आणला होता. यामोर्चांखे आयोजन जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे करण्यात आले होते.

मोर्चांची सुरूवात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून होवून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येथे आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. तसेच यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कॉ. नाना ठाकरे, भगवान कोळी, प्रकाश चौधरी, विजय पवार, जगदीश कोळी, रफीक पिंजारी, चिरागोद्दीन मिस्त्री, फारूख शेख, रामलला मिस्त्री आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाच्या प्रलंबित लाभांची प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत, नोंदणी व पुनर्नोंदणी करणे कामी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र न देणार्‍या व बिगर नोंदीत कामगारांकडून काम करून घेणार्‍या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच चाळीसगाव क्रीडा संकुलच्या शासकीय बांधकाम साईटवरून गंभीर दुखापत होवून अपगंत्व आलेल्या बांधकाम मजूरास भरपाई अनिल भोळे बांधकाम व्यवसायीकाने नाकारल्याने या व्यवसायीकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकाम कामगार कायदा, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अमंलबजावणी करणे यासह इतर मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.