बांधकाम नोंदणी शिबिरात 63 कामगारांची नोंदणी

0

नवापुर । राज्यशासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासकिय कामगार अधिकारी कार्यालय धुळे यांच्याकडुन आयोजित बांधकाम कामगारांच्या नोंदणी शिबिरात तालुक्यातील 63 कामगारांची नोंदणी करण्यात आली. शहरातील इदगाहरोडवरील जमातखान्यात अखिल भारतीय बेलदार समाजाचे महासचिव अनिसखॉ सरदारखॉ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर भरविण्यात आले. या शिबिरात धुळे येथील शासकिय कामगार अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विलास गायकवाड, मोहनिश भामरे, अरुण महाजन, नोंदणी करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या स्वयंसेवी संस्थेचे हरियाणा येथील संचालक रिंकु सैनी, संदिप पाटील आदि उपस्थित होते.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासकीय सुविधा
देशभरात राबविण्यात आलेल्या या नोंदणीमुळे नेहमी उपेक्षित असलेल्या बांधकाम कामगारांसाठी आता नवे पर्व सुरु होत असल्याचे प्रास्ताविकातुन अनिसखॉ सरदारखॉ यांनी सांगितले. कामगार नोंदणीकृत झाल्यानंतर त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती, विवाह, अपघात, मृत्युआदींसाठी शासनाच्या तरतुदी, लाभ तथा सवलतींची माहिती विलास गायकवाड व मोहनिश भामरे यांनी दिली. याप्रसंगी शहर व तालुक्यातील 63 बांधकाम व्यावसायिक व कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येऊन त्यांना नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेत. शिबिरात सोनगीर, शहादा व दोंडाइचा येथील बेलदार समाजाचे पदाधिकारी तथा तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते. बेलदार समाजाचे तालुकाअध्यक्ष इसामोद्दीन सिराजोद्दीन बेलदार यांनी अतिथींचे स्वागत केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष मजीद मोहियोद्दीन बेलदार यांनी केले तर सचिव मुश्ताक हाजी सत्तार शेख यांनी आभार मानलेत. मुजफ्फर गुलाबखॉ बेलदार, रहिमोद्दीन नसीरोद्दीन शेख, अख्तर हाजी सत्तार शेख, शरीफ सलीम शेख, नुरुद्दीन रशियोद्दीन, जावेद नजमोद्दीन, रसुल जहुर बेलदार, अन्वर सरवर बेलदार, असलम निजामोद्दीन व सहकार्‍यांनी शिबीराच्या यशस्वितेसाठी कामकाज पाहिले.