पिंपरी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रमुख उत्पन्न असलेल्या विभागांपैकी बांधकाम परवानगी विभागाच्या 2018 मधील उत्पन्नापेक्षा 2019 या वर्षातील उत्पन्नात वाढ झाली आहे. 2018 मध्ये 299.57 कोटी उत्पन्न मिळाले होते. तर, 2019 मध्ये 520.83 कोटीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अवघ्या सात महिन्यात उत्पन्नवाढीचा टप्पा गाठल्याने महापालिकेच्या उत्पन्नात 221.26 कोटींची अधीकची भर पडली आहे.
सन 2019-20 च्या अंदाजपत्रकामध्ये बांधकाम परवानगी विभागास जमेचे उदृदीष्ट 350 कोटी दिले होते. 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या नू महिन्याच्या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाला 520.83 कोटीचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी 1 एप्रिल 2018 ते 31 डिसेंबर 2018 अखेर मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेने 221.26 कोटीने वाढ झाली आहे. तसेच, 14 जानेवारी 2020 अखेर एकूण 541.70 कोटी उत्पन्न मिळाले आहे. सन 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये देण्यात आलेल्या जमेचे उदृदीष्ट 350 कोटी हे माहे ऑक्टोंबर 2019 या 7 महिन्याच्या कालावधीतच पुर्ण केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमताच अंदाजपत्रकातील उदृदीष्ट 7 महिन्यातच पुर्ण केलेला बांधकाम परवानगी विभाग हा एकमेव विभाग आहे. या विशेष उत्पन्न वाढीबदृल राजन पाटील, सह शहर अभियंता, कार्यालयातील कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, राजेंद्र राणे, श्रीरिष पोरेड्डी यांचा व विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचा उत्कृष्ट कार्यक्षमतेबदृल आयुक्त श्रावण हर्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते गौरवपत्राची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर आंघोळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार आदी अधिकारी उपस्थित होते.