दोंडाईचा । घरकुल व शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असतांना बनावट कागदपत्रांद्वारे ते पूर्ण केल्याचे दाखवून एक लाखाचा अपहार केल्याचा प्रकार मालपूर येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात ग्रामसेवकासह 9 जणांवर दोंडाईचा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष निंबा इंदवे, रा. मालपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरकुल योजनेतील घरांचे व शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले नसतांनाही ते पूर्ण झाल्याची कागदपत्रे व फोटो शासनाकडे पाठवून बँकेतून 1 लाख मालपूरला घरकुल योजनेत अपहार ग्रामसेवकासह 9 जणांविरुद्ध गुन्हा रुपयाची हडप करण्यात आली.
संगनमताने शासनाची फसवणूक
फिर्यादीनुसार, भगवान भटू वसईकर, ग्रामविकास अधिकारी आर.बी. निकुंभे, राजश्री लक्ष्मण पानपाटील, लक्ष्मण गंभीर पानपाटील, तत्कालीन स्थापक अभियांत्रिकी बांधकाम उपविभाग, पंचायत समिती, शिंदखेडा, तत्कालीन शाखा कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती, शिंदखेडा, तत्कालीन अभियंता उपविभाग, पंचायत समिती, शिंदखेडा, तत्कालीन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिंदखेडा यांनी संगनमताने या अपहाराप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाला सादर केलीत व शासनाची एक लाखांत फसवणुक केली. हा प्रकार सन 2014 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान मालपूर ग्रामपंचायत येथे घडला. या फिर्यादीवरुन वरील संशयित 9 जणांविरुद्ध भादंवि कलम 420, 506, 409, 468, 120, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ ठाकरे करीत आहेत