विविध योजनाचा शुभारंभ
पिंपरी : महाराष्ट्र सरकारने बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे यासाठी कष्टकरी कामगार पंचायतवतीने पंचायत अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले आहे. या कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेल्या मजुरांना विविध कल्याणकारी 28 योजनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
मजुरांना ओळखपत्र वाटप
महाराष्ट्रच्या अनेक जिल्ह्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुणे येथे नांदेड सिटी येथे देखील हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सह्या कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, गीते, पंचायत अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते कंबळे, बांधकाम व्यावसायिक सतिश मगर, कामगार नेते जयंत शिंदे आदी उपस्थित होते. अनेक बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यात आली. तसेच नोंदणी कृत बांधकाम मजुरांना विविध योजनेची माहिती देण्यात आली. ओळखपत्र वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व बांधकाम मजुरांनी घ्यावा. तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मजुरांनी आपली नोंदणी करून घ्यावा असे अव्हान बाबा कंबळे यांनी केले आहे,