बांधकाम व्यावसायिकडून महिलेचा विनयभंग

0

निगडी : फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्याच्या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडे गेलेल्या महिलेला व्यावसायिकाने अश्‍लील शिवीगाळ करत ढकलून दिले. ही घटना आकुर्डी येथील पंचतारानगर येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद सुभाषचंद्र गोयल (वय 40, रा.निगडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद याची पेठ क्रमांक 27-अ, येथे 461 येथे बांधकाम साईट सुरू आहे. फिर्यादी महिला आरोपीच्या बांधकाम साईटवर गेली होती. तिने फ्लॅट नंबर दोनचे रजिस्ट्रेशन करून पाहिजे, असे सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपी गोयल याने महिलेला अश्‍लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला ढकलून देत विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.