बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर पिंपळे गुरव येथे शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. स्फ्टि गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी शेलार यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शेलार यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेलार यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पिंपळे गुरव येथील तुळजा भवानी मंदिरात सकाळी अकराच्या सुमारास योगेश शेलार दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शेलार यांच्यावर गोळीबार केला.

शेलार यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण नेहमीच गजबजलेले असते. त्याचबरोबर घटना ज्या ठिकाणी घडली तिथपासून पोलीस चौकीही फार दूर नाही. दरम्यान, शेलार यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता व पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.