नंदुरबार। नंदुरबार शहरालगतच्या कोकणी हिल दुधाळे परिसरातील डी.आर.हायस्कुलमध्ये नववीत शिकणारा निष्पाप विद्यार्थी स्व.राज ठाकरे यांचा गळा चिरुन निर्घृण खून केलेल्या बाल गुन्हेगार नामे प्रमोद दत्तू चौरे व उदयराज दिलीप गोसावी या बाल गुन्हेगारांना आश्रय देणारे जि.प.अर्थ व बांधकाम सभापती दत्तू भिला चौरे हे राजकीय पदाचा वापर करुन शासकीय वाहनाचा गैरवापर केला जात असून सदर गुन्हेगारांना मदत करीत आहे.
अशा प्रसंगी बाल गुन्हेगारांवर जिल्हा सत्र न्यायालयात सदर गुन्ह्याची सुनावणीसाठी दावा दाखल असून निपक्षपातीपणे सुनावणी होवून गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत जि.प.अर्थ व बांधकाम सभापती दत्तू भिला चौरे यांच्या राजीनामा मागणीसाठी बुधवार 16 ऑगस्ट रोजी नवापूर चौफुली, देवमोगरा माता मंदिरापासून सकाळी 10 वाजता नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व समाजातील महिलांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन वंदना नंदकिशोर ठाकरे, मालती डी. वळवी, भारती जगन्नाथ बहिरम, अल्का अशोक अहिरे, आशा बाबुराव गांगुर्डे आदी महिला संघटनांतर्फे करण्यात आले आहे.