धुळे । बांधकाम कंपनीच्या साईटवरुन रिक्षामध्ये पाईप टाकून चोरी करणार्यापैकी एकाला पाठलाग करुन वॉचमन आणि साईटवरील कर्मचार्यानी पकडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. जवाहरनगर साक्री रोड धुळे येथे राहणार्या अविनाश शांताराम पाटील (वय 32) या वॉचमनने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश पाटील हा मानस कन्स्ट्रक्शनमध्ये वॉचमन म्हणून कामाला आहे. मानस कन्स्ट्रक्शनचे मोराणे गावच्या शिवारातील तनेजा क्रेशर जवळ पुलाचे काम सुरु आहे.त्याच ठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे.
मध्यरात्री घडली घटना
रात्री 12 वाजेच्या दरम्यान अविनाश पाटील हे बांधकाम साहित्याची पाहणी करीत असतांना केसींग पाईप कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजू-बाजूला पाहिले असता नकाणे तलावाकडे जाणार्या रस्त्यावर त्यांना एका रिक्षामध्ये टाकलेले पाईप दिसले. रिक्षा तलावाकडे जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने त्याचे सहकारी मनोज दुबे, हितेश, कमलेश सिंग यांना फोन करुन घटनेची माहिती दिली ते ताबडतोब घटनास्थळी आले. या चौघांनी जीपमधून रिक्षाचा पाठलाग सुरु केला. दरम्यान रिक्षातील दोन जण पळून गेले. चालक मात्र सापडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हे.कॉ.राजेंद्र मोरे घटनास्थळी त्यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. 9 हजारचे पाईप आणि 25 हजाराची एम.एच.15 जे.8013 क्रमांकाची रिक्षाही जप्त केली आहे. रिक्षा चालकाने त्याच्या चोर साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली आहेत. राकेश दिपक बोरसे रा.बजरंगबलीच्या मंदिरामागे रा.महिंदळे,नरेश धाकु भोई रा.महिंदळे अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.