बांधावर माती टाकल्याने शेतकरी कुटूंबावर प्राणघातक हल्ला

0

धुळे । शेताच्या बांधावर माती टाकण्याच्या कारणावरुन धामणगांव ता.धुळे येथील शेतकरी कुटूंबावर 10 जणांनी प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 पैकी तीन आरोपींना अटक केली आहे.

निर्मलाबाई मधुकर पाटील (वय 51) या महिलेने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 8 दिवसांपुर्वी निर्मलाबाई आणि तिचा पती मधुकर ओंकार पाटील,मुलगा योगेश मधुकर पाटील यांनी शेतात ठिबकच्या नळ्या टाकण्याचे काम केले. त्यावेळी बांधावर माती टाकली. बांधावर माती का टाकली या कारणावरुन वणी गावच्या शिवारातील शेतात प्रताप माणिक पाटील, उमेश प्रताप पाटील, सुनिल पुंजाराम पाटील, गोपाल हिलाल पाटील, आशाबाई सुनिल पाटील, कल्पनाबाई प्रताप पाटील, अरुण माणिक पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील, समाधान राजेंद्र पाटील, शुभम सुनिल पाटील सर्व रा.धामणगांव यांनी कुर्‍हाडीने मधुकर पाटील आणि योगेश यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.