पाचोरा । बांबरुड खु पाचोरा येथील सरपंच मंदाकिनी निळकंठ पाटील यांना नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेमार्फत राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार 2016-2017 प्रदान करण्यात आला. मंदाकिनी पाटील यांनी केलेल्या समाजकार्य, महिला सबलीकरण तसेच बांबरुड गावासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याबद्दल यथोचित राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरवण्यात आले.
नाशिक येथे मान्यवरांचे हस्ते झाला गौरव
नाशिक येथील शिवपुत्र धत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था ही एक राष्ट्रीय उपक्रमशिल संस्था असुन या संस्थेच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना कृतज्ञता म्हणून दरवर्षी हा पुरस्कार देवुन सन्मानित केले जाते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सन्मानमुर्ती नाशिक मतदार संघाचे पदविधर आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस कमिशनर डॉ. रविंद्र सिंघल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल यांची उपस्थिती होती उपस्थित होते. तर बांबरुड खु ता. पाचोरा च्या सरपंच मंदाकिनी पाटील यांना कविवर्य नारायण सुमंत (जेष्ठ कवी व वात्रटीकाकार) व अपुर्वा जारवाडी (अंतराळ अभ्यासक तथा प्रशिक्षक, नासा) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.