भातखंडे । भडगाव तालुक्यातील भातखंडे येथून जवळच असलेल्य बांबरुड बुद्रुक (प्र.उ.) येथे काल मध्यरात्री गावाच्या शेजारी असलेल्या अशोक सदाशिव पाटील यांच्या शेतात मेंढपाळ आले आहेत. त्यात एका वन्यजीव प्राण्याने एक मेंढी ठार केली तर दुसरी जखमी केली असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वनरक्षक सुरेश काळे, एस.आर.पाटील, वनपाल आर.बी.चौरे हे आले असता त्यांनी वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणा तपासल्या असता त्या बिबट्याच्या नसून लांडगा किंवा तडस च्या असाव्यात असा अंदाज केला आहे, असे असले तरी शेतात जाताना सावधगिरी बाळगावी, हातात काठी घेऊन जावे, एकटे दुकटे जाऊ नये दोन-तीन जण मिळून जावे व रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून घ्यावी पण शक्यतो रात्री शेतात जाऊ नये, अशा सूचना वनविभागाच्या अधिकार्यांनी दिल्या आहेत. या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी बांबरूढचे सरपंच रवींद्र रायसिंग भिल यांनी केली आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी सह गावाचे ग्रामसेवक श्री. बोराडे सह गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.