बांभोरी अभियांत्रिकीत कार्यशाळा

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष 2017-18 पासून लागू करावयाच्या पहिला वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कार्यशाळा नुकतीच पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.सत्येंद्र मिश्रा, समन्वयक अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखा यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यशाळेला प्रा.एस.टी.बेंद्रे, प्राचार्य जी.के.पटनायक, प्राचार्य आर.पी. बोरकर, डॉ.संजय शेखावत, डॉ.पी.जे.शहा व विविध अभियांत्रिकी महाविद्यालय यातील शिक्षक उपस्थित होते.