जळगाव । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील 22 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी 1 वाजता लक्षात आले.
कविता राकेश सोनवणे (वय 22, रा. दत्तनगर, वाल्मिकनगर) यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना एक लहान मुलगी आहे. त्यांचे जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर आहे. त्या मुलीला घेऊन शनिवारी माहेरी गेल्या. मुलगी माहेरी ठेऊन त्या रविवारी बांभोरी येथील घरी गेल्या. मात्र, त्यांनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पाळधी दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.