बाईकचे चाक चोरणाऱ्या चोरट्यांना रंगे हाथ अटक

0

कल्याण : डोंबिवली नजीक असलेल्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग मधून बाईकचा पुढचा टायर चोरून नेनाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. संदेश परब व विशाल देसाई असे या चोरट्याचें नाव असून गर्दीचा फायदा घेत त्यांच्या एका साथीदाराने पळ काढला .याच चोरट्यानी या आधी ही दुचाकीमधील पेट्रोल ही चोरी केल्याचा आरोप करत दुचाकीमालक चंद्ररत्न कांबळे यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे .