बागी-2 च्या आधी दिशाचे बोल्ड फोटोशूट

0

‘जीक्यू इंडिया’ मॅग्झिनने इंस्टाग्राफ अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफसोबत बागी-2 या चित्रपटात लवकरच दिसणारी दिशा पाटणी हिचे पहिल्यांदाच बोल्ड स्वरूपातील काही फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या बॉलिवुडमध्ये दिशा पाटनी हिला आता कोणी थांबवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ‘एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ या पहिल्या हिंदी चित्रपटातून बॉलिवुडमधील करिअररला सुरुवात करणारी दिशा ही सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. चाहत्यांकडूनही तिला प्रेम मिळत आहे. आता दिशा पाटणी हिने जीक्यू मॅग्झिनसाठी फोटोशूट केले आहे. कालपर्यंत दिशाच्या चेहर्‍यावरून ती साधी व सरळ स्वभावाची दिसत होती, मात्र या फोटोंवरून तिचा बोल्ड लूकही समोर आला आहे. दिशा पाटनी हिने ‘जीक्यू इंडिया’ या मॅग्झिनसाठी फोटोशूट केले आहे. अशा स्वरूपाचे फोटो तिने पहिल्याप्रथम काढले आहेत. आता दिशा तिचा एक्स बॉयफे्ंरड टायगर श्रॉफ सोबत बागी-2 या चित्रपटात काम करणार असून कोरियोग्राफरपासून दिग्दर्शक बनलेले अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.