चिंबळी । खेड तालुक्यात इद्रायंणी नदीला पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे चिंबळी, कुरुळी, मोशी, मोई, केळगांव, डुडूळगांव परिसरातील शेतकरी उन्हाळी हंमातील बाजरीचे व भुईमुगाचे पिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. शेतकर्यांनी आता बाजरीची लागवड केली आहे. पोषक वातावरणामुळे हे पिक हिरवेगार झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधान वक्त करीत आहेत.