बाजारपेठेतील उलाढालीवर विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

0

जळगाव। केसीई सोसायटी संचलित आयएमआर महाविद्यालयात उद्योजकता विकास सेल’ उपक्रमातंर्गत बीबीए इंटिग्रेटेडच्या 70 विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीपासून ते दिवाळी पर्यंतच्या काळात होणारी उलाढाल व लोकांच्या आवडीनिवडीबाबत शहरातील 1230 घरांमध्ये सर्वेक्षण केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

असे केले मुद्देनिहाय सर्वेक्षण
आयएमआर महाविद्यालयातील बीबीएच्या विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात पाच दिवस शहरातील 1230 घरांमध्ये प्रश्‍नावलीच्या माध्यामातून सर्वेक्षण करत माहिती संकलित केली. या सर्वेक्षणात होम किचन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांमध्ये बाजारपेठेत होणारी उलाढाल याबाबत माहिती जमा केली. या सर्वेक्षणाचे प्रा.विशाल संदानशीवे व प्रा. नितीन खर्चे ह्यांनी सांख्यिक विवरण तयार केले. या प्रोजेक्टसाठी समन्वयक प्रा. विशाल संदानशिवे व प्रा. नितीन खर्चे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रा. स्वप्नील काटे, प्रा. खुशबू बांगर, प्रा. दिपाली पाटील, जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर वाणी, विजय पाटील यांचे सहकार्य लाभले. होम किचन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पाद खरेदी यामध्ये सर्वात जास्त 29.17 टक्के मोबाइल खरेदीला पसंती दिली आहे. यानंतर होम किचनमध्ये आवडीचे ब्रँड एल.जी 17.10%, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आवडीचे ब्रँड सॅमसंग 12.79%, टू व्हीलरमध्ये गियर बाईक 45%, फोर व्हीलर प्रकारात एस.यु. व्ही. कार 64%, टू व्हीलर मध्ये आवडीचे ब्रँड होंडा 24.13 %, फोर व्हीलरमध्ये आवडीचे ब्रँड मारुती सुजुकीला 20.63 % लोकांनी पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.