नंदुरबार। दहा दिवसांच्या मुक्कामाला येणार्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी नंदनागरी सज्ज झाली आहे,दि 24 आगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात गणेशमूर्ती घेण्यासाठी भक्तांनी तोबा गर्दी केली होती. नजीकच्या गुजरात, म्हध्यप्रदेश राज्यातील मंडळांचे कार्यकर्ते दाखल होऊन वाजत गाजत येथून मुर्त्या घेऊन गेले,घरगुती गणपती बसविण्यासाठीही कुटुंबातील सदश्यानी गर्दी केली होती,त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली.
नंदुरबारचा गणेशोत्सव म्हटला म्हणजे महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. येथील मूर्तिकारांनी साकारलेल्या आकर्षक व सुबक मुर्त्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही,त्यामुळे मूर्त्याना मोठी मागणी असते, गणेशोत्सव व याच काळात येणार्या बकरी ईदच्या पाश्वभूमीवर पोलिस यंत्रणेनेही दक्षता घेतील असून त्याचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकानी भेट देऊन पाहणी केली आहे.