बाजारात आली तैमुरची बाहुली

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा सुपुत्र आणि प्रचंड लोकप्रिय किड म्हणजेच तैमुर अली खान सध्या आघाडीवर आहे. तैमुर कुठल्याही ठिकाणी दिसला की चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. ऐवढेच नाही, तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतं असतात.

आता तैमुरला केवळ न पाहता त्याच्यासोबत खेळू शकतात. बाजारात तैमुरची बाहुली आली आहे, तैमूरचे चाहते या बाहुलीला विकत घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत खेळू शकता. सोशल मीडियावर तैमुरच्या बाहुलीचा फोटो व्हायरल होत आहे.

खेळणी तयार करणाऱ्या कंपनीने ही नवीन बाहुली बाजारात आणली आहे. ही बाहुली केरळच्या एका स्टोअरमध्ये विकत मिळत आहे.